फेडरल बँक पुणे मॅरेथॉन 2025 मध्ये धावणार मिलिंद सोमण!
फेडरल बँक पुणे मॅरेथॉन 2025 मध्ये धावणार मिलिंद सोमण! पुणे, 3 जानेवारी 2025: येत्या पाच जानेवारीला आयोजित केली जात असलेली फेडरल बँक पुणे मॅरेथॉन 2025 ही नववर्षातील देशातील पहिली मॅरेथॉन आहे आणि मिलिंद सोमण हे फेडरल बँक पुणे मॅरेथॉनचे ब्रँड ॲम्बेसेडर आहेत. फिटनेस आयकॉन म्हणून परिचित असलेले त्याचबरोबर विविध मॅरेथॉनमध्ये सहभागी होणारे मिलिंद सोमण हे हाफ मॅरेथॉनमध्ये धावणार आहेत. आपल्या प्रत्यक्ष सहभागातून मिलिंद सोमण समुदायाला एकत्र येण्याबरोबरच या ऐतिहासिक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आमंत्रित करत आहेत. मॉडेलिंग, अभिनय आणि फिटनेस या क्षेत्रात वैविध्यपूर्ण कारकीर्द असलेले मिलिंद सोमण हे एक कुशल व्यक्तीमत्व म्हणून सर्वांना परिचित आहेत. फिटनेसबाबत अतिशय दक्ष असलेल्या मिलिंद सोमण यांनी अवघ्या 15 तास आणि 19 मिनिटांत अतिशय खडतर अशी आयर्नमॅन ट्रायथलॉन यशस्वीरित्या पूर्ण केलेली आहे. 10 किमी पोहणे, 421 किमी सायकलिंग आणि 84 किमी दुहेरी मॅरेथॉन या तीन क्रीडाप्रकारांचा समावेश असलेल्या अल्ट्रामॅन ट्रायथलॉनमधील यशस्वी सहभागाबद्दल ते आता “अल्ट्रामॅन” म्हणून ओळखले जातात. एवढेच नव्हे तर अनवाणी धावण्यासाठीस...
Comments
Post a Comment