मोटीसन्स ज्वेलर्स लिमिटेडची प्रारंभिक सार्वजनिक ऑफर सोमवार, 18 डिसेंबर 2023 रोजी, किंमत बँड ₹52 ते ₹55 प्रति इक्विटी शेअर सेट


 

·        प्रति इक्विटी शेअर ₹52 - ₹55 चा प्राइस बँड आहे, ज्याचे दर्शनी मूल्य प्रत्येकी ₹10 आहे (“इक्विटी शेअर्स”)

·        बिड/ऑफर उघडण्याची तारीख - 18 डिसेंबर 2023 आणि बिड/ऑफरची शेवटची तारीख - 20 डिसेंबर 2023 आहे.

·        किमान बिड लॉट 250 इक्विटी शेअर्स आणि त्यानंतर 250 इक्विटी शेअर्सच्या पटीत आहे.

·        फ्लोअरची किंमत इक्विटी शेअरच्या दर्शनी मूल्याच्या 5.2 पट आहे आणि कॅप किंमत इक्विटी शेअरच्या दर्शनी मूल्याच्या 5.5 पट आहे.

 


 


 

मुंबई, 12 डिसेंबर 2023: जयपूरस्थित हायपर लोकल ज्वेलरी रिटेल चेन, मोटीसन्स ज्वेलर्सने आपल्या ग्राहकांना डिझाईन्स, उच्च दर्जा, पारदर्शकता आणि ग्राहक सेवा देण्यावर लक्ष केंद्रित केले आहे, त्यांच्यासाठी  पहिल्या प्रारंभिक सार्वजनिक ऑफरचा प्रति इक्विटी शेअर ₹ 52 ते ₹ 55 असा किंमत बँड निश्चित केला आहे. कंपनीची इनिशियल पब्लिक ऑफरिंग (“IPO” किंवा “ऑफर”) सोमवार, 18 डिसेंबर 2023 रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडेल आणि बुधवार, 20 डिसेंबर 2023 रोजी बंद होईल. गुंतवणूकदार किमान 250 इक्विटी शेअर्ससाठी बोली लावू शकतात आणि त्यानंतर 250 इक्विटी शेअर्सच्या पटीत.

रुपये 10 प्रति इक्विटी शेअर्सच्या दर्शनी मूल्याचा सार्वजनिक इश्यू हा पूर्णपणे 2, 74, 71, 000 इक्विटी शेअर्सचा नवीन इश्यू आहे ज्यामध्ये विक्रीसाठी ऑफर घटक नाही (OFS).

मोटीसन्स ज्वेलर्सचे व्यवस्थापन दुस-या पिढीतील उद्योजक संदीप छाबरा, अध्यक्ष आणि पूर्णवेळ संचालक आणि संजय छाबरा, व्यवस्थापकीय संचालक, कै. मोतीलाल छाबरा यांचे पुत्र, ज्यांचे दागिने उद्योगात दोन दशकांहून अधिक वर्षांचे कौशल्य आहे.

त्याच्या इतर ऑफरिंग्समध्ये सोने आणि चांदीची नाणी, भांडी आणि इतर कलाकृतींचा समावेश आहे. त्याने 1997 मध्ये 'मेसर्स मोटीसन्स ज्वेलर्स' या भागीदारी फर्मद्वारे आपला व्यवसाय सुरू केला होता आणि त्यानंतर 2011 मध्ये त्याचे पब्लिक लिमिटेड कंपनीत रूपांतरित केले होते आणि सध्या जयपूर, राजस्थानमध्ये अनेक प्रमुख ठिकाणी त्यांची उपस्थिती आहे.

 

मोटीसन्सने 1997 मध्ये जयपूर, राजस्थान येथे एकाच शोरूममध्ये दागिन्यांचा व्यवसाय सुरू केला. त्याचे पहिले आउटलेट, ज्याला ‘पारंपारिक स्टोअर’ म्हणून ओळखले जाते, ते शहराच्या मध्यभागी असलेल्या प्रसिद्ध ज्वेलरी हब, सर्वात व्यस्त जोहरी बाजाराच्या प्रसिद्ध गल्ल्यांमध्ये स्थापित केले गेले.

ते प्रामुख्याने भारतभरातील तृतीय पक्ष पुरवठादारांकडून दागिने तयार करून घेतात  आणि त्याच्या व्यवसायात सोने, हिरे, कुंदन यात केलेल्या दागिन्यांची विक्री आणि मोती, चांदी, प्लॅटिनम, मौल्यवान, अर्ध-मौल्यवान खडे आणि इतर धातूंचा समावेश असलेल्या इतर दागिन्यांची विक्री  आणि  जयपूर, राजस्थानमधील अनेक प्रमुख ठिकाणी सोन्या-चांदीची नाणी, भांडी आणि इतर कलाकृती यांचा समावेश होतो.

त्याच्या उत्‍पादन पोर्टफोलिओमध्‍ये 300,000+ ज्‍वेलरी डिझाईन्सचा समावेश आहे ज्यामध्‍ये सर्व वयोगट, लिंग आणि विविध किंमतींसाठी रोज घालण्‍याचे दागिने, विवाह आणि सण यांसारख्या विशेष प्रसंगी पारंपारिक, समकालीन आणि एकत्रित दागिन्यांच्या डिझाईन्सचा समावेश आहे.


Comments

Popular posts from this blog

फेडरल बँक पुणे मॅरेथॉन 2025 मध्ये धावणार मिलिंद सोमण!

Ahmedabad-based Senores Pharmaceuticals Limited files DRHP for IPO

Carraro India Limited’s Initial Public Offering to open on Friday, December 20, 2024, price band set at ₹668/- to ₹704/- per Equity Share