रॉक्स अँड रोलर-स्टोरेज टेक्नॉलॉजीज अँड ऑटोमेशन लिमिटेडच्या एसएमईची खुली समभाग विक्री (इनिशअल पब्लिक ऑफरींग) आयपीओ ३० एप्रिल २०२४ पासून

रॉक्स अँड रोलर-स्टोरेज टेक्नॉलॉजीज अँड ऑटोमेशन लिमिटेडच्या एसएमईची खुली समभाग विक्री (इनिशअल पब्लिक ऑफरींग) आयपीओ मंगळवार ३० एप्रिल २०२४ पासून

प्राईस बँड प्रति समभाग रु. ७३/- ते रु. ७८/- दरम्यान

·       प्रत्येकी रु. १० फेस व्‍हॅल्यू असलेल्या प्रत्येक समभागाचे प्राईस बँड प्रतिसमभाग रु. ७३ ते रु. ७८

·       बिड/ऑफर सुरु होणार मंगळवार दिनांक ३० एप्रिल २०२४ रोजी व बंद होणार शुक्रवार ३ मे २०२४ रोजी.

·       किमान बिड/ऑफर लॉट १६०० समभाग व त्यापुढे १६००च्या पटीत.

·       फ्लोअर प्राईस शेअर फेस व्‍हॅल्यूच्या ७.३ पट व कॅप प्राईस शेअर फेस व्‍हॅल्यूच्या ७.८ ठेवण्यात आले आहे.

 

मुंबई, एप्रिल ३०, २०२४: बेंगळुरु स्थित रॉक्स अँड रोलर स्टोरेज टेक्नॉलॉजी अँड ऑटोमेशन लिमिटेड ही कंपनी रॅकींग सिस्टिम पुरवठा व्‍यवसायात असून कंपनीकडे याचे डिझाईन व मॅन्युफॅक्चरींग तसेच उभारणी सेवा देण्याचे वैशिष्ठ्य आहे. मेटल स्टोरेज रॅक्स, ऑटोमेटेड वेअरहाउस, आणि अन्य स्टोरेज अर्थात वखार संबंधित सेवा पुरवण्यात कंपनी माहीर आहे.

या रॉक्स अँड रोलर्स लिमिटेड कंपनीने रु. ७३/- ते रु. ७८/- प्राईसबँड असलेले व फेस व्‍हॅल्यू म्हणजे रु. १०/- दर्शनी मूल्य असलेले शेअर आयपीओच्या माध्यमातून खुल्या विक्रीसाठी देउ केले आहेत. कंपनीची ही आयपीओ ऑफर मंगळवार दिनांक ३० एप्रिल २०२४ रोजी खुली होईल व शुक्रवार दिनांक ३ मे २०२४ रोजी बंद होईल. गुंतवणूकदार किमान १६०० शेअर व त्यापुढे १६०० च्या पटीत शेअर खरेदीसाठी बीड करु शकतील.

आयपीओमध्ये ३,८४०,००० फ्रेश इश्यूचा समावेश असून ऑफर फॉर सेलचा पर्याय ठेवण्यात आलेला नाही.

इश्य बुक बिल्डिंग प्रोसेसच्या माध्यमातून करण्यात आला असून एकूण इश्यूच्या ५० टक्क्याहून अधिक शेअर क्वालिफाईड इंस्टीट्यूशनल बायर साठी ठेवण्यात आलेले नाहीत, तसेच १५ टक्क्यांपेक्षा कमी शेअर नॉन इंस्टिट्यूशनल इनव्‍हेस्टरसाठी ठेवण्यात आलेले नाहीत. तसेच ३५ टक्क्यापेक्षा कमी शेअर रिटेल इंडिव्‍हीज्युअल इनव्‍हेस्टरसाठी ठेवण्यात आलेले नाहीत.

कंपनीच्या या आयपीओतून एकूण रु. २७.५० कोटी रुपये निव्‍वळ उत्पन्न मिळणार असून ते सामान्य कॉर्पोरेट खर्च व वर्किंग कॅपिटल गरजा पूर्ण करण्यासाठी वापरले जाणार आहे.

रॉक्स अँड रोलर्स-स्टोरेज टेक्नॉलॉजीज अँड ऑटोमेशन लिमिटेड कंपनीची स्थापना श्री मोहम्मद अरीफ आणि श्री खासीम सैत या प्रमोटरनी २०१० साली केली होती. त्यांच्याकडे स्टोरेज अँड रॅकींग सिस्टिम इंडस्ट्रीचा १३ वर्षांचा अनुभव आहे.

कंपनीकडे उत्पादन आणि सेवांचे विविध पर्याय उपलब्ध असून त्यायोगे आधुनिक, नाविन्यपूर्ण व कार्यक्षम वेअरहौसिंग सेवा देण्यास कंपनी कटिबद्ध आहे. कंपनीच्या सेवा तेल आणे वायू, मोटारींचे सुटे भाग, विमानउद्योग, अन्न प्रक्रिया उद्योग, शीतगृहे, औषध उद्योग, वस्त्रोद्योग, किरकोळ, एफएमसीजी, मालवाहतूक व अन्य उद्योगांना पुरवण्यात येत आहेत.

बेंगळुरु स्थित ही कंपनी ग्राहकांवर लक्ष केंद्रीत करुन व्‍यवहार करते. कंपनी सातत्याने नाविन्यकरण व कार्यक्षमता वाढवण्यावर भर देते. तसेच कंपनीकडे डिस्प्ले आणि स्टोरेज रॅकच्या विविध डिझाइन्स व्‍यापार व औद्योगिक वापरासाठी उपलब्ध आहेत. कंपनीच्या उत्पादनांसाठी उच्च दर्जाच्या कच्च्या मालाचा वापर केला जातो. यामुळे कंपनीची र्सव उत्पादने टिकाउ व मजबूत असतात. कच्च्या मालामध्ये विविध ग्रेडचे माईल्ड स्टील (हॉट रोल्ड कॉईल्स, गॅल्व्‍हनाइझ्ड स्टील कॉइल, पीपीजीआय कॉइल्स, पाईप्स, व स्ट्रक्चरल सेक्शन ) पावडर कोटींग्स, इपॉक्सी, एनॅमल पेंट आणि पॅकेजिंगचे प्लॅस्टीक यांचा समावेश असतो.

 

कंपनीचा कारखाना बँगलोर येथे येलहांका हुबळी जवळील सिंगनायाकनाहाळ्ळी येथे ५६२५० चौरस फूट क्षेत्रावर कंपनीचा अद्ययावत कारखाना आहे. या कारखान्यात ५६२५० चौरस फूट स्टोरेज सुविधा आहे. यामुळे निर्मिती प्रक्रिया सुरळीत सुरु असते. कंपनी प्रॉडक्ट डिझाइन, निर्मिती, क्वालीटी चेकींग, पॅकेजिंग, स्टोरींग आणि डिलिव्‍हरी ही कामे करते%

कंपनी आपले निर्मिती सामर्थ्य, स्पर्धा क्षमता, व्‍यूहात्मक व्‍यवसाय धोरण, स्टोरेज टेक्नॉलॉजी, ऑटोमेशन यांच्या माध्यमातून ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यास सक्षम आहे. तसेच कंपनी नाविन्यकरण, क्वालिटी, आणि वेळेत डीलीव्‍हरी देण्यास कटीबध्द आहे.

१ एप्रिल २०२४ रोजी कंपनीकडे एकूण ३१.३६ कोटी रुपये मूल्याच्या ऑर्डर आहेत.

रॉक्स अँड रोलर्स-स्टोरेज टेक्नॉलॉजीज अँड ऑटोमेशन लिमिटेड कंपनी २०२२ साली ०.२० कोटी रुपये तोट्यात होती. त्यानंतर २०२३ वित्तीय वर्षात कंपनीने ०.४८ कोटी रुपये नफा कमावला. तसेच २०२३ वित्तीय वर्षात कंपनीच्या महसूलात १६.३९ टक्के वाढ झाली आणी तो ६९.८७ कोटींवरुन तब्बल ८१.३२ कोटींवर पोहोचला. कंपनीच्या ग्राहकांची वाढीव संख्या व वाढीव व्‍यवसाय यामुळेच हे शक्य झाले.

३१ ऑक्टोबर २०२३ रोजी समाप्त सात महिन्यात कंपनीने ५२.९२ कोटी रुपये महसूल आणि त्यायोगे ३.५९ कोटी रुपये निव्‍वळ नफा कमावला आहे.

वन व्‍ह्यू कॉर्पोरेट ॲडव्‍हाझर्स प्रायव्‍हेट लिमिटेड ही कंपनी बुक रनींग लीड आहेत. तसेच कंपनीचे शेअर बीएसई लिमिटेडच्या एसएमई प्लॅटफार्मवर लीस्ट करण्यात येणार आहेत.

Comments

Popular posts from this blog

फेडरल बँक पुणे मॅरेथॉन 2025 मध्ये धावणार मिलिंद सोमण!

Ahmedabad-based Senores Pharmaceuticals Limited files DRHP for IPO

Carraro India Limited’s Initial Public Offering to open on Friday, December 20, 2024, price band set at ₹668/- to ₹704/- per Equity Share