गो डिजिट जनरल इन्शुरन्सतर्फे आयपीओ
मुंबई: १२ मे २०२४: इन्शुररटेक स्टार्ट-अप कंपनी असलेल्या गो डिजिट जनरल इन्शुरन्सचा आयपीओ येत्या १५ मेपासून खुला होत असून १७ मेपर्यंतला बंद होणार आहे. कंपनी या आयपीओच्या माध्यमातून २,६१४.६५ कोटी रुपये उभे करणार आहे. यासाठी, कंपनी १,१२५ कोटी रुपयांच्या किमतीचे नवीन शेअर्स जारी करणार असून विद्यमान गुंतवणूकदारांना १,४८९.६५ कोटी किमतीचे ५.४७ कोटी शेअर्स ऑफर फॉर सेल द्वारे विकतील. गुंतवणूकदाराला किमान ५५ शेअर्ससाठी अर्ज करता येईल. कंपनीने आयपीओसाठी २५८-१२७२ असा किंमतपट्टा निश्चित केला आहे.
Comments
Post a Comment