स्टॅन्ले लाईफस्टाईल्स लिमिटेड कंपनीची आयपीओ समभाग विक्री शुक्रवार 21 जून 2024 पासून सुरू, प्राईस बँड रु. 351/- ते रु. 369/- प्रतिसमभाग
स्टॅन्ले लाईफस्टाईल्स लिमिटेड कंपनीची आयपीओ समभाग विक्री शुक्रवार 21 जून 2024 पासून सुरू, प्राईस बँड रु. 351/- ते रु. 369/- प्रतिसमभाग
· रु. 2/- फेस व्हॅल्यू असलेल्या प्रत्येक समभागासाठी प्राईस बँड रु. 351/- ते रु. 369/- दरम्यान
· बिड/ऑफर खुलण्याची तारीख- शुक्रवार दि. 21 जून 2024 तर बिड/ऑफर बंद होण्याची तारीख मंगळवार दि. 25 जून 2024
· किमान बिड लॉट 40 समभाग व त्यापुढे 40 समभागांच्या पटीत
· फ्लोअर प्राईस समभागाच्या फेसव्हॅल्यूच्या 175.50 पट आणि कॅप प्राईस समभागाच्या फेसव्हॅल्यूच्या 184.50 पट
मुंबई, जून 14: स्टॅन्ले लाईफस्टाईल्स लिमिटेड या बेंगळुरु स्थित कंपनीने आपल्या आयपीओ समभाग विक्रीसाठी प्रतिसमभाग प्राईस बँड मूल्य रु. 351/- ते रु. 369/- दरम्यान निश्चित केले आहे. कंपनीची आयपीओ समभाग विक्री (आयपीओ अथवा ऑफर) शुक्रवार दि. 21 जून 2024 रोजी खुली होईल आणि मंगळवार दि. 25 जून 2024 रोजी बंद होईल. गुंतवणूकदार किमान 40 समभाग व त्यापुढे 40 समभागांच्या पटीत गुंतवणुक बिड सादर करु शकतील.
प्रत्येकी रु. 2 फेसव्हॅल्यू असलेल्या समभाग विक्री ऑफर मध्ये रु. 200 कोटींच्या फ्रेश इश्यूचा समावेश आहे. तसेच ऑफर फॉर सेल अंतर्गत प्रमोटर्स व अन्य समभागधारकांकडून 9,133,454 समभाग विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत.
ॲक्सिस कॅपिटल लिमिटेड, आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड, जे एम फायनान्शिअल लिमिटेड आणि एसबीआय कॅपिटल मार्केट्स लिमिटेड या कंपन्या या आयपीओ ऑफरच्या बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत. तसेच केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेड ही कंपनी निबंधक म्हणून काम पाहात आहे. कंपनीचे समभाग बीएसई व एनएसई या प्रमुख शेअरबाजारांमध्ये सूचीबद्ध करण्यात येणार आहेत.
आयपीओ ऑफर बुकबिल्डिंग प्रक्रियेच्या माध्यमातून सेबी नियम ६ (१) (इश्यू ऑफ कॅपिटल अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस २०१८) अन्वये देवू करण्यात आली आहे.
Comments
Post a Comment