सॅनस्टार लिमिटेडची आयपीओ विक्री 19, जुलै, 2024 पासूनप्राईस बँड प्रतिसमभाग रु.90/- ते रु.95/-
· रु. 2/- फेसव्हॅल्यू असलेल्या प्रत्येक समभागासाठी, प्राईस बँड रु.90/- ते रु.95/-
· बिड/ऑफर खुली होण्याची तारीख , 19 जुलै, 2024, आणि बंद होण्याची तारीख 23 जुलै, 2024.
· बिड करण्यासाठी किमान लॉट 150 समभाग व त्यापुढे 150 च्या पटीत
· फ्लोअर प्राईस समभाग फेस व्हॅल्यूच्या 45 पट, तर कॅप प्राईस समभाग फेस व्हॅल्यूच्या 47.50 पट.
मुंबई, 15 जुलै, 2024: भारतात अन्न, पशु आहार, आणि अन्य औद्योगिक उपयुक्ततेची उत्पादने आणि सुविधा पुरवठा क्षेत्रात आघाडीवर असलेल्य सॅनस्टार लिमिटेड या कंपनीने (स्त्रोत: कंपनी आयोग फ्रॉस्ट अँड सल्लीव्हन रीपोर्ट, तारीख 18 मे 2024) आयपीओच्या माध्यमातून खुली समभाग विक्री करण्याचे जाहीर केले आहे. कंपनीची ही आयपीओ विक्री येत्या, 19 जुलै 2024 रोजी सुरु होईल व 23 जुलै 2024 रोजी बंद होईल. सॅनस्टार लिमिटेड कंपनीने आपल्या आयपीओ विक्रीसाठी प्रत्येकी रु. 2/- फेसव्हॅल्यू असलेल्या समभागासाठी प्राईस बँड रु.90 ते रु. 95 दरम्यान निश्चित केला आहे. गुंतवणूकदार किमान 150 समभागांचा लॉट आणि त्यापुढे 150 च्या पटीत समभागांसाठी बिड करु शकणार आहेत.
आयपीओमध्ये फ्रेश इश्यूच्या माध्यमातून 41.80 दशलक्ष समभाग आणि ऑफर फॉर सेल (ओएफएस) अंतर्गत 11.90 दशलक्ष समभागांच्या विक्रीचा समावेश असून ही विक्री प्रमोटर व समभागधारक प्रमोटर समूह यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
सॅनस्टार लिमिटेड कंपनी अहमदाबाद येथे विविध उत्पादनांचे उत्पादन घेते. त्यात लिक्विड ग्लुकोज, ड्राईड ग्लुकोज, माल्टोडेक्स्ट्रीन, डेक्स्ट्रोज मोनोहायड्रेट, देशी मका खळ (स्टार्च), सुधारित मका स्टार्च, आणि जर्म्स, ग्लुटेन,फायबर, मेझ स्टीप लिकर व तत्सम उत्पादनांचा समावेश आहे. कंपनीची ही खास उत्पादने आणि घटक द्रव्ये, थिकनींग एजंट, स्टॅबिलायझर्स, स्वीटनर्स, एमल्सिफायर्स, व जोडद्रव्ये विविद पदार्थांची चव, पोत व पोषणमूल्ये वाढवण्यास मदत करतात. अशा पदार्थात बेकरी उत्पादने, केक, पास्ता, सूप, केचअप, सॉसेस, क्रीम्स, आणि डेझर्ट या गटातील पदार्थांचा समावेश होतो. त्याचप्रमाणे कंपनी पशुआहार उत्पादनांचे देखील उत्पादन घेते. याद्वारे पशुआहारातील पोषण मूल्यांची वाढ केली जाते. तसेच कंपनी डिसइंटीग्रंट्स, एक्सायपीअंट्स, सप्लीमेंट्स, कोटींग एजंट्स, बाइंडर्स, स्मूथिंग व फ्लॅटनिंग एजंट्स आणि फिनिशिंग एजंट्स यासारख्या औद्योगिक उत्पादनांचे देखील उत्पादन घेते.
सॅनस्टार लिमिटेड कंपनीचे महाराष्ट्रात धुळे व गुजरात मध्ये कच्छ येथे मिळून दोन कारखाने असून ते एकूण 245 एकर क्षेत्रावर उभारण्यात आले आहेत. त्यांचे एकूण क्षेत्रफळ सुमारे 10.68 दशलक्ष चौरस फूट आहे. दोन्ही कारखान्यांची मिळून एकूण वार्षिक उत्पादन क्षमता 3,63,000 टन अर्थात दररोज 1100 टन आहे. भारतात मक्यापासून खास उत्पादनांची निर्मिती करणाऱ्या प्रमुख पाच कंपन्यांत सॅनस्टार लिमिटेडचा समावेश होतो असे फ्रास्ट अँड सल्लीव्हन अहवाल तारीख 18 मे 2024 मध्ये नमूद करण्यात आले आहे.
कंपनी आपल्या उत्पादनांची निर्यात आशिया, आफ्रिका, आखाती देश आणि अमेरिका, युरोप व ओशियाना खंडातील एकूण 49 देशांना करते. तसेच कंपनीने संपूर्ण भारतात देखील आपला ठसा उमटवला असून २२ राज्यात आपल्या उत्पादनांचा पुरवठा करते.
सॅनस्टार कंपनीने 2022 आर्थिक वर्षात 504.40 कोटी रुपये महसूल मिळवला होता. 2024 आर्थिक वर्षात कंपनीने सालागणिक 45.46 टक्के वाढीने 1067.27 कोटी रुपये महसूल मिळवला आहे. तसेच कंपनीने या महसूलातून 2024 साली सालागणिक 104.79 टक्के वाढीने 66.77 कोटी रुपये करोत्तर नफा (पॅट) कमावला आहे. 2022 साली कंपनीने 15.92 कोटी रुपये करोत्तर नफा कमावला होता. ही आकडेवारी कंपनीच्या ताज्या अर्थवृत्तांतानुसार आहे.
पँटामॉथ कपिटल ॲडव्हायझर्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आयपीओची एकमेव बुक रनिंग लीड मॅनेजर आहे तसेच लींक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आयपीओची रजिस्ट्रार अर्थांत निबंधक आहे. कंपनीचे समभाग बीएसई व एनएसई या देशातील प्रमुख शेअरबाजारांमध्ये सूचीबद्ध करण्यात येणार आहेत.
आयपीओ ऑफर बुक बिल्डिंग प्रक्रियेद्वारे सादर करण्यात येत आहे. यात अर्हतापात्र संस्थात्मक गुंतवणुकदार (क्यूआयबी) साठी 50 टक्क्यांपेक्षा अधिक समभाग उपलब्ध केले जाणार नाहीत. तसेच बिगर संस्थात्मक गुंतवणुकदारांसाठी 15 टक्क्यांहून अधिक समभाग उपलब्ध केले जाणार नाहीत. तसेच किरकोळ गुंतवणूकदारांसाठी 35टक्क्यांपेक्षा कमी समभाग उपलब्ध केले जाणार नाहीत.
Comments
Post a Comment