जेएनके इंडिया लिमिटेडच्या प्रारंभिक सार्वजनिक ऑफरला मंगळवार 23 एप्रिल 2024 पासून प्रारंभ

जेएनके इंडिया लिमिटेडच्या प्रारंभिक सार्वजनिक ऑफरला 
मंगळवार 23 एप्रिल 2024 पासून प्रारंभ
प्रति समभाग किंमत पट्टा 395 ते 415 रुपये निश्चित

• -प्रत्येकी दोन रुपये दर्शनी मूल्याच्या (“इक्विटी शेअर्स”) समभागासाठी 395 ते 415 रुपये किंमतपट्टा  
• -बोली/ऑफर उघडण्याची तारीख - मंगळवार, 23 एप्रिल, 2024 आणि बोली/ऑफरची शेवटची तारीख - गुरुवार, 25 एप्रिल, 2024.
• -किमान 36 समभागाचा एक लॉट आणि त्यानंतर 36 समभागांच्या पटीत बोली लावता येणार.
• -समभागाच्या दर्शनी मूल्याच्या 197.50 पट फ्लोअर प्राईस आहे आणि कॅप किंमत समभागाच्या दर्शनी मूल्याच्या 207.50 पट आहे.
 






 


मुंबई, 18 एप्रिल, 2024: तेल आणि वायू शुद्धीकरण, पेट्रोकेमिकल आणि खत उद्योगासारख्या प्रक्रिया उद्योगासाठी आवश्यक असलेले हीटर्स, रिफॉमर्स आणि क्रॅकिंग फर्नेस (एकत्रित "हीटिंग इक्विपमेंट" असा उल्लेख) तयार करण्याच्या व्यवसायात असलेल्या जेएनके इंडिया लिमिटेडने त्यांच्या प्रारंभिक सार्वजनिक ऑफरसाठी (आयपीओ) प्रत्येकी २  रुपये दर्शनी मूल्य असलेल्या समभागविक्रीसाठी 395  ते 415 रुपये असा किंमतपट्टा निश्चित केला आहे.

कंपनीची प्रारंभिक सार्वजनिक विक्री (“आयपीओ” किंवा “ऑफर”) मंगळवार 23 एप्रिल 2024 रोजी सुरु होणार असून गुरुवार 25 एप्रिल 2024 रोजी बंद होणार आहे. 

गुंतवणूकदार किमान 36 समभाग आणि त्यानंतर 36 समभागांच्या पटीत आपली बोली लावू शकतात.

कंपनीच्या या समभाग विक्रीमध्ये 3,000 दशलक्ष रुपयांचा नवीन इश्यू समाविष्ट आहे. तसेच प्रवर्तक आणि वैयक्तिक भागधारक यांच्याकडून 8,421,052 समभागांची विक्रीसुध्दा (ओएफएस) समाविष्ट आहे.
कंपनीकडे थर्मल डिझायनिंग, अभियांत्रिकी, उत्पादन, हीटिंग उपकरणे पुरवणे, त्यांची उभारणी करणे आणि ते कार्यान्वित करणे यासारख्या क्षमता आहेत. कंपनी देशांतर्गत आणि विदेश या दोन्ही बाजारपेठांतील ग्राहकांच्या गरजांची पूर्तता करते. (स्रोत: एफ अँड एस अहवाल). गेल्या काही वर्षांत कंपनीने फ्लेअर्स आणि इन्सिनरेटर सिस्टीममध्ये विविधता आणली आहे. त्याचबरोबर ग्रीन हायड्रोजनसह अक्षय उर्जा क्षेत्रात क्षमता विकसित केलेली आहे. तेल आणि वायू रिफायनरीज, पेट्रोकेमिकल्स, खते, हायड्रोजन आणि मिथेनॉल वनस्पती इत्यादी प्रक्रिया उद्योगांमध्ये हिटींग उपकरणांची आवश्यकता असते. 
कंपनीने 31 डिसेंबर 2023 पर्यंत भारतातील 21 ग्राहकांना तसेच विदेशातील 8 ग्राहकांना सेवा दिलेली आहे. भारतात आंध्र प्रदेश, आसाम, बिहार, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, तामिळनाडू, पश्चिम बंगाल या राज्यांत तर जागतिक पातळीवर  नायजेरिया आणि मेक्सिकोमध्ये येथे प्रकल्प पूर्ण केलेले आहेत. त्याचबरोबर भारतात गुजरात, ओडिशा, हरियाणा, राजस्थान तर जागतिक स्तरावर ओमान, अल्जेरिया आणि लिथुआनियामध्ये कंपनीकडून प्रकल्पांचे काम सुरु आहे. याशिवाय कंपनीने भारतात अनेक दुर्गम भागातही अनेक प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत. त्यात नुमालीगढ, आसाम, कोची, केरळ; बरौनी, बिहार येथील प्रकल्पांचा समावेश आहे. परदेशात लागोस, नायजेरिया येथेही दुर्गम भागातील प्रकल्पांची कंपनीने यशस्वी उभारणी केलेली आहे. 
कंपनीकडे असलेल्या देशांतर्गत ग्राहकांमध्ये इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड, टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेड, राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड आणि नुमालीगढ रिफायनरी लिमिटेड आदी दिग्गज कंपन्यांचा समावेश आहे. त्याचबरोबर कंपनीने युरोपमधील अग्रगण्य अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम (“ईपीसी”) कंपनी, ओमानमधील तेल आणि वायू उत्खनन आणि उत्पादन कंपनी आणि तेल आणि वायू क्षेत्रामधील युरोपियन ईपीसी कंपनीची मध्यपूर्व शाखा यासारख्या परदेशी ग्राहकांनासुध्दा सेवा पुरवलेली आहे. कंपनीने आपल्या स्थापनेपासून, जेएनके ग्लोबल कंपनी लिमिटेड (पूर्वी जेएनके हिटर्स कंपनी लिमिटेड म्हणून ओळखली जाणारी) या KOSDAQ-सूचीबद्ध कंपनीबरोबर काम करत आहे. जेएनके ग्लोबल कंपनी लिमिटेड  (पूर्वी JNK Heaters Co. Ltd म्हणून ओळखले जायची) ही कंपनीच्या कॉर्पोरेट प्रवर्तकांपैकी एक आहे आणि त्यांच्याकडे रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसच्या तारखेपर्यंत 25.79 टक्के हिस्सा आहे.
कंपनीची गुजरातमधील मुंद्रा स्पेशल इकॉनॉमिक झोन येथे इन-हाऊस फॅब्रिकेशन सुविधा कार्यान्वित आहे. अंदाजे 20,243 चौरस मीटरमध्ये हा प्रकल्प पसरलेला आहे आणि तेथे सध्या प्रतिवर्ष 5,000 मेट्रिक टन फॅब्रिकेशन आणि मॉड्युलरायझेशनची क्षमता आहे.
31 डिसेंबर 2023 पर्यंत कंपनीकडे 8,450.27 दशलक्ष रुपयांच्या ऑर्डर्स आहेत.
कंपनीची ही ऑफर बुक बिल्डिंग प्रक्रियेद्वारे केली जात आहे. त्यामध्ये पात्र संस्थात्मक खरेदीदारांना ऑफरच्या 50% पेक्षा जास्त हिस्सा वाटपासाठी उपलब्ध नसेल, तर गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी ऑफरच्या किमान १५ %  हिस्सा उपलब्ध असेल. ऑफरच्या किमान 35 टक्के हिस्सा रिटेल वैयक्तिक गुंतवणूकदारांना वाटपासाठी उपलब्ध असेल.
------

Comments

Popular posts from this blog

फेडरल बँक पुणे मॅरेथॉन 2025 मध्ये धावणार मिलिंद सोमण!

Ahmedabad-based Senores Pharmaceuticals Limited files DRHP for IPO

Carraro India Limited’s Initial Public Offering to open on Friday, December 20, 2024, price band set at ₹668/- to ₹704/- per Equity Share